Ezekiel 19:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आता ती द्राक्षवेल, रुक्ष व निर्जल वाळवंटी प्रदेशात लावली आहे. सर्वांत मोठ्या फांदीला लागलेली आग पसरली. त्या आगीने सर्व डहाळ्यांचा व फळाचा नाश केला. आता हातात धरण्याची काठी व राजदंड उरला नाही.’ हे मृत्यूबद्दलचे शोकगीत, मृत्यूसाठीच, गायिले गेले.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तिच्या शाखांतील धुमार्यातून अग्नी निघून त्याने तिची फळे खाऊन टाकली आहेत; आता अधिकार चालवण्याचा राजदंड होण्याजोगा तिच्यावर मजबूत धुमारा एकही राहिला नाही.’ हे विलापगीत आहे व विलापासाठी राहील.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तिच्या एका मुख्य फांदीमधून अग्नी पसरला आणि तिचे फळ भस्म केले. अधिकार्याच्या राजदंडासाठी योग्य अशी एकही मजबूत फांदी तिच्यावर राहिली नाही.’ हे विलापगीत आहे आणि विलापगीत म्हणूनच त्याचा उपयोग व्हावा.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तिच्या दाट फांद्यांना अग्नीने होरपळले आणि फळे खाऊन टाकीली, तेथे आता बळकट फांदी उरली नाही, न्यायाचा राजदंड नाही, तेथे आक्रोश आणि रडगाणे आहे.