Ezekiel 20:18 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मी त्यांच्या मुलांशी वाळवंटात बोललो. मी त्यांना सांगितले, “तुमच्या आई-वडिलासारखे होऊ नका. त्यांच्या गलिच्छ मूर्तीबरोबर तुम्हीही गलिच्छ होऊ नका. नियम पाळू नका. त्यांच्या आज्ञा पाळू नका. त्यांच्या त्या गलिच्छ गोष्टीबरोबर तुम्हीही गलिच्छ होऊ नका.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तसेच रानात मी त्यांच्या वंशजांना म्हणालो, तुम्ही आपल्या वडिलांच्या नियमांप्रमाणे चालू नका, त्यांच्या निर्णयांना अनुसरू नका, व त्यांच्या मूर्तींनी आपणांस विटाळू नका.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांच्या लेकरांना मी रानात म्हटले, “तुमच्या आईवडिलांच्या कायद्याचे अनुसरण करू नका किंवा त्यांचे नियम पाळू नका व त्यांच्या मूर्तींमुळे तुम्हास विटाळू नका.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
रानात मी त्यांच्या पुत्रपोत्रास म्हणालो तुम्ही आपल्या वाडवडीलांच्या नियमांनी चालू नका, तुम्ही त्यांचा करार पाळू नका किंवा मूर्तीपूजा करून स्वतःस अशुद्ध करु नका.