Ezekiel 20:30 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
देव म्हणाला, “इस्राएलच्या लोकांनी अशा सर्व वाईट गोष्टी केल्या म्हणून त्यांच्याशी बोल. त्यांना सांग ‘परमेश्वर, माझा देव, पुढील गोष्टी सांगतो, तुमच्या पूर्वजांनी केलेली कृत्ये करुन तुम्ही स्वत:ला अमंगळ करुन घेतले आहे, गलिच्छ करुन घेतले आहे, तुम्ही वेश्येप्रमाणे वागला आहात. तुमच्या वाडवडिलांनी पूजलेल्या भयंकर दैवतांसाठी तुम्ही माझा त्याग केला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्याकरता इस्राएल घराण्यास सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, काय? तुम्ही आपल्या वडिलांच्या मार्गास लागून आपणांस विटाळवता व अनाचार करून त्यांच्या अमंगळ वस्तूंच्या मागे लागता,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“म्हणून इस्राएली लोकांना सांग: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: तुमच्या पूर्वजांप्रमाणे तुम्हीदेखील स्वतःला अशुद्ध करून आणि त्यांच्या घृणास्पद मूर्तींची वासना बाळगणार काय?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ह्यासाठी इस्राएलाच्या घराण्यास सांग, परमेश्वर देव असे म्हणतो काय? तुम्ही आपल्या वाडवडीलांना मार्गास लागून स्वत:ला विटाळवीता काय? आणि वेश्ये प्रमाणे कृती करून किळस आणणाऱ्या गोष्टीचा शोध घेता?