Ezekiel 20:34 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी ह्या इतर राष्ट्रांतून तुम्हाला बाहेर काढीन. इतर राष्ट्रांत तुम्हाला पसरविले पण मी तुम्हाला ह्या सर्व देशांतून परत आणून एकत्र करीन. मग मी माझा हात तुमच्यावर उचलून तुम्हाला शिक्षा करीन. मी तुमच्यावर माझा राग किती आहे हे दाखवून देईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी प्रबल बाहूने, उगारलेल्या हाताने व कोपवृष्टी करून तुम्हांला राष्ट्रांतून आणीन, ज्या देशात तुमची पांगापांग झाली आहे त्यांतून तुम्हांला एकत्र करीन;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी तुम्हाला राष्ट्रांमधून आणेन आणि ज्या ठिकाणी तुम्ही पांगला आहात त्या देशांमधून; बलवान हाताने, उगारलेल्या बाहूने व क्रोधवृष्टी करीत मी तुम्हाला एकत्र करेन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी राष्ट्रातून तुम्हास बाहेर आणिन, आणि जेथे जेथे तुमची पांगापांग झाली तेथून आणून तुम्हास एकत्र करीन मी हे आपल्या प्रबळ बाहूने उगारलेल्या हाताने कोपवृष्टी करीन.