Ezekiel 20:38 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
माझ्याविरुध्द गेलेल्या पापी लोकांना तुमच्या मातृभूमीतून मी हालवीन. ते इस्राएलमध्ये कधीच परत येणार नाहीत. मगच तुम्हाला मी परमेश्वर असल्याचे पटेल.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बंडखोर व माझ्याबरोबर फितुरी करणारे ह्यांना मी तुमच्यापासून वेगळे करीन; ते अल्पकाळ वस्ती करून आहेत त्या देशांतून त्यांना बाहेर नेईन; पण इस्राएल देशात त्यांचे येणे होणार नाही, म्हणजे तुम्हांला समजेल की मी परमेश्वर आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जे माझ्याविरुद्ध उठतात आणि बंड करतात त्यांच्यापासून मी तुम्हाला वेगळे करेन. जरी ज्या देशात ते राहतात तिथून मी त्यांना बाहेर आणेन, तरीही इस्राएल देशात ते प्रवेश करणार नाहीत. तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुम्हातील बंडखोर व माझ्याशी फितुर कोण यांची मी साफ सफाई करणार, अल्पकाळ जे इतर राष्ट्रात राहत होते, त्यांना मी बाहेर घालवून देणार व पुनःरुपी ते इस्राएलात प्रवेश करणार नाही. मग तुम्हास कळेल मी परमेश्वर देव आहे.