Ezekiel 20:39 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
इस्राएल लोकांनो, परमेश्वराने, माझ्या देवाने, पुढील गोष्टी सांगितल्या, कोणाला “त्या अमंगळ मूर्तीची पूजा करावीशी वाटत असेल, तर खुशाल करु दे. पण नंतर माझ्या सल्याची अपेक्षा ठेवू नका. तुम्ही त्या गलिच्छ मूर्तीना बलिदान देऊन ह्यापुढे अजिबात माझ्या नावाला बट्टा लावू शकणार नाही.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यास्तव प्रभू परमेश्वर असे म्हणतो, हे इस्राएल घराण्या, जा, आपल्या हव्या त्या मूर्तीची पूजा कर; पण पुढे तुम्ही खरोखर माझे ऐकाल, आणि आपल्या अर्पणांनी व मूर्तींनी माझ्या पवित्र नामास बट्टा लावणार नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“ ‘अहो इस्राएली लोकहो, तुमच्याविषयी म्हटले तर, सार्वभौम याहवेह असे म्हणतात: जा तुम्ही प्रत्येकजण तुमच्या मूर्तींची सेवा करा! परंतु त्यानंतर तुम्ही खचितच माझे ऐकाल आणि तुमच्या भेटींनी व मूर्तींनी माझे नाव आणखी अपवित्र करणार नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग त इस्राएलाच्या घराण्या परमेश्वर देव असे म्हणत आहे, प्रत्येक जण त्यांच्या मूर्ती मागे गेले आहेत, त्यांची उपासना करून त्यांनी माझे ऐकण्याचे नाकारले आहे, पण तू आता माझ्या पवित्र वस्तूबद्दल मूर्तीला भेट देऊन यापुढे माझा अनादर करणार नाही.