Ezekiel 20:41 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मगच तुम्ही अर्पण केलेल्या वस्तूंच्या सुंगधाने मी प्रसन्न होईन. मी तुम्हाला परत आणीन तेव्हाच असे घडेल. मी तुम्हाला पुष्कळ देशांत विखरुन टाकले. पण मी तुम्हाला एकत्र करुन माझे खास लोक म्हणून पुन्हा तुमची निवड करीन. सर्व राष्ट्रांसमक्ष मी हे करीन.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी तुम्हांला राष्ट्रांतून बाहेर आणीन व ज्या देशांत तुमची पांगापांग झाली आहे त्यांतून तुम्हांला जमा करीन, तेव्हा मी सुगंधाप्रमाणे तुमचा स्वीकार करीन आणि तुमच्या ठायी माझी पवित्रता विदेशी राष्ट्रांना प्रकट होईल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा मी तुम्हाला राष्ट्रांतून बाहेर आणेन आणि ज्या देशांमध्ये तुमची पांगापांग झाली तिथून मी तुम्हाला एकत्र करेन, तेव्हा सुवासिक धुपाप्रमाणे मी तुम्हाला स्वीकारेन आणि मी तुमच्याद्वारे राष्ट्रांदेखत पवित्र मानला जाईन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी त्यांचे सुवासीक अर्पण स्विकारीन, जेव्हा सर्व लोक देशातून एकत्र जमतील जेथून ते विखुरले गेले होते. मी स्वतःला त्यांना पवित्र असे प्रकट करेन, सर्व राष्ट्रे ते बघतील.