Ezekiel 20:44 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
इस्राएल लोकांनो, तुम्ही खूप वाईट कृत्ये केलीत. त्यासाठी तुमचा सर्वनाश व्हायला पाहिजे होता. पण माझे नाव राखण्यासाठी तुम्हाला योग्य अशी शिक्षा मी केली नाही. ह्यावरुन तुम्हाला मीच देव आहे हे समजून येईल.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे इस्राएल घराण्या, प्रभू परमेश्वर म्हणतो, तुमच्या कुमार्गाप्रमाणे, तुमच्या भ्रष्ट कृत्यांप्रमाणे नव्हे, तर माझ्या नामासाठी मी तुमच्यात कृती करीन, तेव्हा तुम्हांला समजेल की, मी परमेश्वर आहे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
इस्राएलाच्या घराण्या तुमचे वाईट मार्ग आणि दुष्कर्मांनुसार नाही तर माझ्या नामाकरिता मी तुमच्याशी वागेन, तेव्हा तुम्ही जाणाल मीच याहवेह आहे, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.’ ”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग तुम्हास कळेल मी परमेश्वर देव आहे, मी हे माझ्या नामास्तव केले, तुमच्या वाईट भ्रष्ट मार्गासाठी केले नाही. इस्राएलाच्या घराण्या हे परमेश्वर देव जाहीर करतो.