Ezekiel 20:47 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
नेगेवच्या रानाला सांग, ‘परमेश्वराचे शब्द ऐका. प्रभू, माझा देव, असे म्हणाला की तुझ्या रानात आग लावण्याची मी तयारी केली आहे. ती आग प्रत्येक झाड-हिरवे व वाळलेले जाळेल. ज्वाळा विझणार नाहीत. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंतचा प्रदेश आगीत जळेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दक्षिणेतील वनास सांग, परमेश्वराचे वचन ऐक; प्रभू परमेश्वर म्हणतो, पाहा, मी तुझ्यात अग्नी पेटवीन, तो तुझ्यातले प्रत्येक हिरवे झाड व प्रत्येक शुष्क झाड भस्म करील; धगधगणारी ज्वाळा विझायची नाही आणि तिच्या योगे दक्षिणोत्तर सर्व मुखे पोळतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दक्षिणेच्या वनाला सांग: ‘याहवेहचा शब्द ऐका. सार्वभौम याहवेह असे म्हणतात: मी तुझ्यावर अग्नी पाठविणार आहे आणि तो तुझ्या सर्व झाडांना भस्म करेल, ते हिरवे असो वा वाळलेले. ती धगधगती आग विझणार नाही आणि दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत प्रत्येक चेहरा त्यामुळे भाजेल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नेगेबच्या रानाला बोल ऐक परमेश्वर देव काय जाहीर करतो; परमेश्वर देव हे म्हणतोय, बघ मी तुझ्यावर अग्नी पाठवीन. ती सर्व झाडाच्या ताज्या फळांना भस्म करेल व झाडे सुकवून टाकेल. आग विझणार नाही; सर्व उत्तर, दक्षिण भाग जळून भस्म होईल.