Ezekiel 20:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण मी त्यांचा नाश केला नाही. माझे लोक जेथे राहात होते तेथे, त्यांना, मिसरमधून बाहेर काढण्याचे मी अगोदरच कबूल केले होते. तेव्हा त्या सर्वांच्या देखत इस्राएलचा नाश मी केला नाही कारण, मला माझ्या नावाला बट्टा लावायचा नव्हता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तथापि माझ्या नामासाठी, ज्या राष्ट्रांमध्ये ते राहत होते त्यांच्यादेखत माझ्या नामाचा अपमान न व्हावा, म्हणून मी हे कार्य केले; मी त्यांना मिसर देशातून काढून त्या राष्ट्रांच्यादेखत त्यांना प्रकट झालो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु माझ्या नावासाठी मी त्यांना इजिप्तमधून बाहेर आणले. ज्या लोकांमध्ये ते राहिले आणि ज्यांच्यासमोर मी इस्राएली लोकांना प्रकट झालो, त्यांच्या दृष्टीत माझ्या नावाचा अनादर होऊ नये म्हणून मी असे केले
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माझ्या पवित्र नामास्तव ज्या राष्ट्रात ते राहत आहेत त्यांच्या दृष्टीपुढे माझ्या नामाचा अनादर होऊ नये म्हणून मी हे कार्य केले आहे, त्यांना मिसर देशातून काढून त्याच्या दृष्टीसमोर मी त्यास प्रकट झालो.