Ezekiel 21:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“मानवपुत्रा, मोठ्याने ओरड व किंचाळ का? कारण तलवार माझ्या लोकांवर व इस्राएलच्या राज्यकर्त्यांवर चालविली जाणार आहे. त्या राजकर्त्यांना युद्ध हवे होते. म्हणून तलवार येईल तेव्हा ते माझ्या लोकांबरोबर असतील. तेव्हा मांडीवर थापट्या मार आणि दु:ख प्रदर्शित करण्यासाठी मोठ्याने आक्रोश कर.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मानवपुत्रा, ओरड, आक्रंदन कर; कारण ती माझ्या लोकांवर चालली आहे, ती इस्राएलांच्या सर्व सरदारांवर चालली आहे; माझ्या लोकांबरोबर तेही तलवारीने पडले आहेत, म्हणून आपले ऊर बडव.1
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे मानवपुत्रा, मोठ्याने रड आणि विलाप कर, कारण हे माझ्या लोकांविरुद्ध आहे; ते इस्राएलच्या सर्व राजपुत्रांविरुद्ध आहे. माझ्या लोकांसहित त्यांनासुद्धा तलवारीस देण्यात आले आहे. म्हणून तू आपले ऊर बडव.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मानवाच्या मुला, मदतीसाठी हाक मार आक्रोश कर कारण ती तलवार माझ्या लोकांवर आली आहे, ती इस्राएलाच्या वडीलांवर आली आहे ज्याकडे तलवार भिरकावली, ते माझे लोक आहे त्यामुळे अतितीव्र दुःखाने आपली छातीपीट कर.