Ezekiel 21:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देव म्हणाला, “मानवपुत्रा, टाळी वाजव व माझ्यावतीने लोकांशी बोल. “तलवार, दोनदा खाली येऊ देत. तीनदा खाली येऊ देत. ही तलवार लोकांना ठार मारण्याकरिता आहे. ती प्रचंड संहार करण्याकरिता आहे. ती त्यांच्यात शिरेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“मानवपुत्रा, तू संदेश देऊन टाळी वाजव म्हणजे तलवारीस, भोसकणार्या तलवारीस, तिप्पट जोर येईल; त्यांना घेरणारी तलवार थोरांनाही भोसकणारी होईल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“तर हे मानवपुत्रा, भविष्यवाणी कर आणि तुझ्या हात हातावर मार. तलवार दोन वेळा वार करो, किंवा तीन वेळाही चालेल. ही तलवार कत्तल करण्यासाठी; तलवार जी मोठ्या वधासाठी आहे, जिने त्यांना चहूकडून घेरले आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आता तू मानवाच्या मुला, भाकीत कर आणि आपल्या दोन्ही हातांनी टाळी दे यास्तव तलवार तिसऱ्यांदा चालून येईन. ती तलवार अनेकांना ठार मारण्यास, सगळीकडे भेदून पार करण्यासाठी आहे.