Ezekiel 21:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ह्दयाचे भीतीने पाणी होईल. खूप लोक पडतील. नगरीच्या वेशींजवळ, तलवार खूप लोकांना ठार करील. हो! ती विजेप्रमाणे तळपेल. लोकाना मारण्यासाठीच तिला पाणी दिले होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांचे हृदय गलित व्हावे, व त्यांचे पाय पराकाष्ठेचे लटपटावेत म्हणून मी त्यांच्या सर्व वेशींवर घात करणारी तलवार चालवली आहे; अहो! ती विजेप्रमाणे चमकावी असे तिला केले आहे, ती वधासाठी उपसली आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
म्हणजे त्यांची हृदये भीतीने पाणी पाणी होतील आणि पुष्कळ पडतील, कत्तल करण्यासाठीच ही तलवार त्यांच्या सर्व फाटकांवर मी नेमली आहे. पाहा! विजेसारखा वार करण्यास ती बनविली गेली आहे, हत्येसाठी ती उपसली गेली आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याच्या हृदयाचे पाणी पाणी होण्यास आणि अनेकांना अडखळण होण्यासाठी त्यांच्या वेशीवर ठार मारण्यासाठी तलवारी सिध्द केल्या आहे. आहाहा! तिला विजेसारखी चमकवली आहे, ती कसाई सारखी उपसली आहे.