Ezekiel 21:19 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“मानवपुत्रा, बाबेलच्या राजाची तलवार इस्राएलला येऊ शकेल, असे दोन रस्ते रेखाटून काढ दोन्ही रस्ते एकाच देशातून (बाबेलमधून) येतील. मग नगरीला येणाऱ्या रस्ताच्या सुरवातीला खूण कर.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“मानवपुत्रा, बाबेलच्या राजाची तलवार येण्याकरता दोन रस्ते आखून काढ; ते दोन्ही रस्ते एकाच देशातून निघावेत; नगरात जाणार्‍या रस्त्याच्या चवाठ्यावर मार्गदर्शक हाताची एक आकृती खोदून काढ.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“मानवपुत्रा, बाबेलच्या राजाच्या तलवारीसाठी दोन रस्ते आखून घे, दोन्ही एकाच देशातून निघतील. शहराकडे जाताना जिथे दुहेरी वाटा निघतात तिथे चिन्हस्तंभ लाव.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आता तू मानवाच्या मुला बाबेलाच्या राजाची तलवार येण्यासाठी दोन मार्ग सिध्द कर, दोन्ही मार्गाची सुरुवात एकाच ठिकाणी होईल, दिशादर्शक दगड शहराकडे निर्देश करेल.