Ezekiel 21:24 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो, “तुम्ही खूप वाईट गोष्टी केल्यात. तुमची पापे उघड उघड दिसतात. तुमच्या अपराधाचे स्मरण ठेवायला तुम्ही मला भाग पाडलेत. म्हणून तुम्ही शत्रूच्या हाती सापडाल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यासाठी प्रभू परमेश्वर म्हणतो, तुमचे अपराध उघडकीस येऊन तुमच्या सर्व कृत्यांत तुमची पातके दिसून येतात; येणेकरून तुम्हीच आपल्या स्वत:ला अधर्माचे स्मरण देता, तुमचे स्मरण झाले आहे म्हणून तुम्ही परक्यांच्या हाती सापडला आहात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“यास्तव सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ‘तुम्ही लोकांनी उघड बंड करून आणि तुम्ही जे काही करता त्याद्वारे तुमचे अपराध उघड करून, तुमच्या मनात दोष आणला आहे; आणि तुम्ही असे केले आहे म्हणून तुम्ही बंदिवासात नेले जाल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यास्तव परमेश्वर देव हे सांगत आहे, कारण तुझे अपराध माझ्यापुढे स्मरण केले जाईल, तुझे अपराध प्रकट केले जातील; तुझी पापे तुझ्या सर्व कृतीतून दर्शीवीली जातील, यास्तव तू सर्वांच्या स्मरणात राहून आपल्या शत्रुच्या तावडीत सापडशील.