Ezekiel 21:28 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
देव म्हणाला, “मानवपुत्रा, माझ्यावतीने लोकांशी बोल. ‘परमेश्वर, माझा प्रभू, अम्मोनच्या लोकांबद्दल आणि त्यांच्या लज्जास्पद देवाबद्दल पुढील गोष्टी सांगतो, असे त्यांना सांग. “पाहा! तलवार! तलवार म्यानातून बाहेर आली आहे. तिला पाणी चढविले आहे. ती मारायला तयार आहे. ती विजेप्रमाणे तळपावी म्हणून तिला पाणी चढविले आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे मानवपुत्रा, संदेश देऊन सांग, अम्मोनपुत्रांविषयी व त्यांनी केलेल्या निंदेविषयी प्रभू परमेश्वर जे म्हणतो ते सांग; तलवार, वधासाठी तलवार उपसली आहे, फन्ना उडवण्यासाठी, चमकण्यासाठी ती पाजवली आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“आणि तू हे मानवपुत्रा, भविष्यवाणी कर आणि सांग, ‘अम्मोनी लोक व त्यांच्या निंदेविषयी सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “ ‘एक तलवार, एक तलवार, कत्तल करण्यास उपसलेली, नाश करण्यास व विजेप्रमाणे; ती चमकविलेली व चमकणारी आहे!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तर मग तू मानवाच्या मुला भाकीत कर आणि बोल; परमेश्वर देव हे सांगत आहे, अम्मोनच्या मुलांविषयी जो कलंक आहे तो त्यावर येत आहे. तलवार उचलली आहे ती अधाशीपणे ठार मारण्यासाठी तेजधार केली आहे ती विजेप्रमाणे चकाकत आहे.