Ezekiel 22:26 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“याजकांनी माझ्या शिकवणुकीचा नाश केला. माझ्या पवित्र वस्तू त्यांनी अपवित्र केल्या. त्यांना महत्व देत नाहीत. ते माझ्या पवित्र गोष्टी व इतर अपवित्र गोष्टी ह्यात फरक करीत नाहीत. शुद्ध व अशुद्ध गोष्टी सारख्याच मानतात. ते लोकांनाही ह्याबद्दल शिकवण देत नाहीत. माझ्या सुटृ्यांच्या खास दिवसांचा मान राखत नाहीत. त्यांनी माझे पावित्र नष्ट केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तिचे याजक माझ्या नियमशास्त्राचे उल्लंघन करून माझ्या पवित्र वस्तू भ्रष्ट करतात. पवित्र व अपवित्र ह्यांचा ते काही भेद ठेवत नाहीत; शुद्ध व अशुद्ध ह्यांचा फरक ते शिकवत नाहीत; ते माझ्या शब्बाथांविषयी डोळेझाक करतात; त्यांच्यामध्ये माझा अपमान होतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तिचे याजक माझ्या नियमाचे उल्लंघन करतात व माझ्या पवित्र वस्तूंना अपवित्र करतात; पवित्र व सर्वसामान्य यात ते फरक ठेवत नाहीत; शुद्ध व अशुद्ध यात काही भेद नाही अशी शिकवण ते देतात आणि त्यांच्यात मी अपवित्र मानला जाईल म्हणून माझ्या शब्बाथांकडे दुर्लक्ष करतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तिचे याजक माझ्या नियमांच्या विरुध्द दंगल माजवतात; ते माझ्या पवित्र वस्तुबद्दल अनादर दाखवतात, ते पवित्र वस्तू आणि अपवित्रतेची तुलना करीत नाही. त्यांनी आपले डोळे माझ्या शब्बाथावरुन बंद केले आहेत. यास्तव त्यांच्यात माझा अनादर झाला आहे.