Ezekiel 22:28 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“संदेष्टे लोकांना ताकीद देत नाहीत. ते सत्य झाकून ठेवतात. हे संदेष्टे, तटबंदीची दुरुस्ती न करता, वरवर गिलावा देऊन भगदाडे बुजविणाऱ्या, कामगारांप्रमाणे आहेत. त्यांना फक्त खोटेच दिसते. ते मंत्र-तंत्राच्या आधारे भविष्य जाणून घेतात, पण लोकांशी फक्त खोटेच बोलतात. ते म्हणतात ‘परमेश्वर, माझा देव, पुढील गोष्टी सांगतो.’ पण हे सर्व खोटे आहे. परमेश्वर त्यांच्याशी बोललेला नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तिचे संदेष्टे कच्चा चुना त्यांच्याकरता वापरतात; मिथ्या दृष्टान्त पाहून ते त्यांना खोटे शकुन सांगतात व परमेश्वर बोलला नसताही प्रभू परमेश्वर म्हणतो, असे ते बोलतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांचे संदेष्टे खोटे दर्शन व लबाड शकुनाद्वारे या सर्व कृत्यांवर चुन्याचा लेप फासतात आणि याहवेह बोलले नाही तरी ते म्हणतात, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात.’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि त्यांचे द्रष्टे चुना लावलेल्या भिंतीसारखे आहेत ते खोटा दृष्टांत बघतात आणि खोटा शकुन सांगतात व परमेश्वर बोलला नसताही प्रभू परमेश्वर बोलला असे म्हणतात.