Ezekiel 22:4 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“यरुशलेमवासीयांनो, तुम्ही पुष्कळ लोकांना ठार केले. तुम्ही अमंगळ मूर्ती तयार केल्या. तुम्ही अपराधी आहात आणि तुम्हाला शिक्षा होण्याची वेळ येऊन ठेपली आहे. तुमचा शेवट आला आहे. इतर राष्ट्रे तुमची टर उडवितील. ती तुम्हाला हसतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
स्वत: पाडलेल्या रक्ताने तू आपणास दोषी केलेस, तू केलेल्या मूर्तींनी आपणास विटाळवलेस, तू आपला काळ समीप आणलास, तुझी वर्षे भरली आहेत; म्हणून मी तुला राष्ट्रांच्या निंदेस, सर्व देशांच्या थट्टेस पात्र करीन.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जो रक्तपात तू केलास त्यामुळे तू दोषी झालीस आणि ज्या मूर्ती तू बनविल्यास त्यामुळे तू विटाळली आहेस. तुझे दिवस जवळ आणले आहेस आणि तुझ्या वर्षांचा शेवट आला आहे. म्हणून मी तुला राष्ट्राकरिता निंदा व देशांसाठी हास्य असे करेन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू सांडलेल्या रक्त्तासाठी तू दोषी आहेस आणि तू अपवित्र मूर्ती तयार केल्या आहेस, तू आपला काळ जवळ आणला आहेस. यास्तव मी तुझी खरड पट्टी राष्ट्रात काढेल व भूमीवर तुझा उपहास प्रत्येक डोळ्या समोर करेन.