Ezekiel 23:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“अहलीबा माझा विश्वासघात करीतच राहिली. बाबेलमध्ये, भिंतीवर कोरलेली पुरुषांची चित्रे तिने पाहिली. ती लाल गणवेष घातलेल्या खास्दी पुरुषांची चित्रे होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तिने आपल्या व्यभिचाराचे क्षेत्र वाढवले; तिने भिंतीवर रेखलेली पुरुषांची चित्रे पाहिली, ती हिंगुळाने रेखलेली खास्द्यांची चित्रे होती;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“परंतु तिने तिची वेश्यावृत्ती अजून पुढे नेली. भिंतीवर रेखाटलेल्या पुरुषांच्या प्रतिमा तिने पाहिल्या, जी लाल रंगाने रंगविलेली खास्द्यांची चित्रे होती,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग तिने आपल्या व्यभिचाराच्या कारवाया अजून वाढवल्या. तिने भिंतीवर रेखाटलेले चित्र काढले, तिने खास्द्यांची लाल रंगाने आकृती रेखाटली.