Ezekiel 23:22 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
म्हणून, अहलीबा, परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो ‘तुला तुझ्या प्रियकरांची किळस वाटते. पण मी त्यांना येथे आणीन. ते तुझ्याभोवती कोंडाळे करतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यामुळे अगे अहलीबे, प्रभू परमेश्वर म्हणतो, “पाहा, ज्या तुझ्या जारांवरून तुझे मन उडाले आहे त्यांना मी तुझ्याविरुद्ध उठवीन त्यांना तुझ्यावरून चोहोकडून आणीन;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“म्हणून, हे ओहोलीबाह, सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ज्या तुझ्या प्रियकरांपासून तू तिरस्काराने दूर झालीस त्यांना मी तुझ्याविरुद्ध भडकवीन, प्रत्येक बाजूंनी मी त्यांना तुझ्याविरुद्ध आणेन;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यास्तव अहलीबे परमेश्वर देव म्हणतो, “पहा, मी तुझ्या प्रियकरांना तुझ्याविरूद्ध करीन; ज्यांच्या हून तुझे मन दूर झाले आहे त्या सर्वांना तुझ्याविरूद्ध सभोवतालच्या लोकांस करीन.