Ezekiel 23:24 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ह्या लोकांचा जथा तुझ्याकडे येईल. ते घोड्यांवर स्वार होऊन वा रथांतून तुझ्याकडे येतील. ते पुष्कळजण असतील. त्यांच्याजवळ भाले, ढाली, शिरस्त्राणे असतील, ते तुझ्याभोवती जमतील. तू माझ्याशी कसे वागलीस, हे मी त्यांना सांगीन. मग ते त्यांच्या परीने तुला शिक्षा करतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते शस्त्रे, रथ, चाकांची वाहने, निरनिराळ्या लोकांचा दळभार घेऊन तुझ्यावर येतील; ते कवचे, ढाली व शिरस्त्राणे धारण करून तुला चोहोंकडून घेरतील; मी न्याय करण्याचे काम त्यांना सोपवून देईन, म्हणजे ते आपल्या कायद्यांना अनुसरून न्याय करतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हत्यारे, रथ व गाडे व लोकांचा घोळका घेऊन ते तुझ्याविरुद्ध येतील; ते सर्व बाजूंनी तुझ्याविरुद्ध मोठ्या व लहान ढाली आणि शिरटोप घालून तुझ्याविरुद्ध येतील. तुला शिक्षा करावी म्हणून मी तुला त्यांच्या हाती देईन आणि त्यांच्या मापदंडानुसार ते तुला शिक्षा करतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते तुझ्या विरुध्द शस्त्रे, रथ, वाहने, घेऊन येतील. ते मोठे कवच, ढाली, शिरस्त्राण सभोवताली घेऊन येतील तुला शासन करण्याची संधी त्यांना देईन आणि ते तुझ्या कृत्यासाठी तुला शिक्षा करतील.