Ezekiel 23:29 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ते तुझा किती तिरस्कार करतात हे ते तुला दाखवून देतील. तू मिळविलेली प्रत्येक गोष्ट ते काढून घेतील. ते तुला उघडी नागडी करतील. लोकांना तुझी पापे स्पष्ट दिसतील. तू वेश्येप्रमाणे वागलीस आणि दुष्ट स्वप्ने पाहिलीस हे त्यांना कळेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते द्वेषाने तुझा समाचार घेतील, ते तुझी सर्व मालमत्ता हरण करून तुला नागवीउघडी करतील; अशाने तुझ्या शिंदळचाळ्यांची, तुझ्या कामासक्तीची व तुझ्या व्यभिचाराची लाज उघडी पडेल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते तुझ्याशी द्वेषाने वागतील आणि ज्यासाठी तू काम केले त्या सर्व गोष्टी ते तुझ्यापासून हिसकावून घेतील. ते तुला अगदी नग्न करतील आणि तुझ्या वेश्यावृत्तीची लाज उघडी पडेल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
क्रोधाने ते तुझ्याशी सौदा करतील; ते तुझे पद हिरावून घेतील व उघडे नागडे करून काहीच परत करणार नाही, वेश्याकर्माची लाज उघडी केली जाईल, लज्जास्पद स्वभाव, रसमिसळ भाव जाहीर केला जाईल.