Ezekiel 23:39 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्यांच्या मूर्तींना बळी देण्यासाठी त्यांनी त्यांच्या मुलांना ठार मारले. ते माझ्या पवित्र स्थळी गेले आणि ते स्थळ त्यांनी अपवित्र केले. त्यांनी हे कृत्य माझ्या मंदिरात केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण त्यांनी आपल्या पुत्रांचा वध करून ते आपल्या मूर्तींना अर्पण केले, तेव्हा त्याच दिवशी त्या माझे पवित्रस्थान अपवित्र करण्यासाठी त्यांत आल्या; पाहा, माझ्या मंदिरांत त्यांनी असे वर्तन केले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याच दिवशी त्यांनी त्यांच्या लेकरांचे यज्ञ त्यांच्या मूर्तींना केले, ते माझ्या पवित्रस्थानात आले आणि ते अपवित्र केले. माझ्या घरात त्यांनी ही कृत्ये केली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जेव्हा मूर्तीसाठी त्यांनी आपल्या मुलाबाळांचे तुकडे केले, त्याच दिवशी ते माझ्या स्थानी येऊन माझा शब्बाथ भेसळ केला मग पाहा! त्यांनी माझ्या घरात हेच केले.