Ezekiel 24:14 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“मी परमेश्वर आहे. मी तुला सुनावलेली शिक्षा, तुला होईलच. मी तुला शिक्षा करायला कचरणार नाही. मला तुझ्याबद्दल वाईट वाटणार नाही. तू केलेल्या वाईट कृत्यांबद्दल मी तुला शिक्षा करीन.’ असे प्रभू, माझा परमेश्वर, म्हणाला.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी परमेश्वर हे बोललो आहे; हे घडेलच, हे मी करीनच; मी मागे हटणार नाही, गय करणार नाही, ह्याचा मला अनुताप होणार नाही; तुझ्या आचारांनुसार, तुझ्या कर्मांनुसार, ते तुझा न्याय करतील, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“ ‘मी याहवेह हे बोललो आहे आणि मी ते करण्याची वेळ आली आहे. मी आवरून धरणार नाही; मी दया करणार नाही, मी अनुतापणारही नाही. तुझे वर्तन व तुझी कृत्ये यानुसार तुझा न्याय केला जाईल, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.’ ”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी परमेश्वर देव असे जाहीर करतो हे असे घडेलच व ते मी करेलच, मी कडक धोरण सोडून देईन, तुझे मार्ग आणि तुझे कार्य हेच तुझा न्याय करतील; असे परमेश्वर देव जाहीर करत आहे.