Ezekiel 24:17 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण तुझ्या दु:ख दाखविणाऱ्या खुणा तू मूकपणे केल्या पाहिजेस. मृत पत्नीसाठी मोठ्याने आक्रोश करु नकोस. तू नेहमी घालतोस, तेच कपडे तू घातले पाहिजेस. फेटा किंवा पागोटे बांध, जोडे घाल. तुझे दु:ख दाखविण्यासाठी मिशा झाकू नकोस. लोक साधारणपणे सुतकात पाठवितात, ते अन्न खाऊ नकोस.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
उसासा मुकाट्याने टाक; मृतांसाठी शोक करू नकोस, डोक्याला शिरोभूषण घाल, पायांत जोडा घाल, आपले ओठ झाकू नकोस, सुतकात लोक अन्न पाठवतात ते खाऊ नकोस.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शांततेने कण्ह; मेलेल्यासाठी शोक करू नकोस. तुझा पागोटा काढू नकोस आणि आपली पायतणे पायातच असू दे; तुझे तोंड झाकू नकोस किंवा प्रथेनुसार शोक करणार्यांसाठी आणलेले अन्न तू खाऊ नकोस.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू मुकाट्याने खेद व्यक्त कर मृतांसाठी दुःख व्यक्त करु नको, आपल्या डोक्यात फेटा राहू दे, व पायात जोडा घाल आपले तोंड झाकू नको दुःखाच्या समयी पत्नीच्या मुत्युनंतर जे पुरुष अन्न पाठवतात ते खाऊ नको.”