Ezekiel 24:6 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
प्रभू, माझा परमेश्वर, असे म्हणतो. “यरुशलेमचे वाईट होईल. खुनी लोकांच्या नगरीला वाईट काळ येईल. यरुशलेम गंज चढलेल्या भांड्याप्रमाणे आहे. ते गंजाचे डाग निघू शकत नाहीत. ते भांडे स्वच्छ नसल्याने, तुम्ही प्रत्येक मांसाचा तुकडा बाहेर काढा ते मांस खाऊ नका आणि त्या खाराब झालेल्या मांसातून काहीही याजकांना निवडू देऊ नका.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो, ह्या खुनी नगरीला धिक्कार असो! ती गंज चढलेल्या कढईसारखी आहे, तिचा गंज निघत नाही; तिच्यातला एकेक तुकडा बाहेर काढ, त्यावर चिठ्ठ्या टाकायच्या नाहीत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“ ‘कारण सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “ ‘रक्तपाताच्या शहराचा धिक्कार असो, ज्या कढईला गंज लागला आहे, ज्याचा थर जाणार नाही! जसे काढता येईल तसा एकएक मांसाचा तुकडा काढून घ्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यास्तव परमेश्वर देव असे म्हणत आहे, या रक्तपाती शहराचा निषेध असो, ती गंज चढलेल्या भांड्यासारखी आहे; त्याचा गंज निघत नाही, त्याच्या तुकड्यातून तुकडा काढून त्यातून काही निघत नाही.