Ezekiel 25:13 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
म्हणून, परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो: “मी अदोमला शिक्षा करीन. मी अदोमवासीयांचा व तेथील प्राण्यांचा नाश करीन. तेमानापासून ददानापर्यंत सर्व अदोम देशाचा मी नाश करीन. अदोमची माणसे लढाईत मारली जातील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
म्हणून प्रभू परमेश्वर म्हणतो, मी अदोमावर आपला हात उगारीन, त्यांतून मनुष्य व पशू ह्यांचा संहार करीन. तो तेमानापासून पुढे वैराण करीन, ददानापर्यंत लोक तलवारीने पडतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: एदोमविरुद्ध मी माझा हात लांब करेन आणि मनुष्य व पशूंना मी मारून टाकीन. मी त्याला ओसाड करेन आणि तेमान पासून ददानपर्यंत ते तलवारीने पडतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून प्रभू परमेश्वर, म्हणतो, “मी अदोमाला आपल्या हाताने तडाखा देईन आणि प्रत्येक पुरुषाचा व तेथील प्राण्यांचा नाश करीन. तेमानापासून ददानापर्यंत मी त्यांचा विध्वंस करीन, ते ठिकाण सोडून देईन. ते तलवारीने पडतील.