Ezekiel 25:14 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मी माझ्या लोकांच्या, इस्राएलच्या हातून, अदोमचा सूड उगवीन. अशा रीतीने, माझा अदोमवरचा राग इस्राएलचे लोक दाखवून देतील. मग मी अदोमला शिक्षा केल्याचे अदोमच्या लोकांना कळेल.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी आपले लोक इस्राएल ह्यांच्या हातून अदोमाचा सूड घेईन; माझ्या आवेशयुक्त क्रोधानुसार ते अदोमाची वाट लावतील; त्यांना माझ्या सुडाचा अनुभव येईल, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माझ्या इस्राएली लोकांच्या हातूनच मी एदोमवर माझा सूड घेईन, आणि माझा राग व क्रोधानुसार ते त्यांच्याशी वागतील; ते माझा सूड अनुभवतील, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.’ ”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
याप्रकारे मी आपले लोक इस्राएल यांच्या हातून अदोमावर सूड घेईन आणि माझ्या क्रोधाप्रमाणे आणि माझ्या त्वेषाप्रमाणे ते अदोमाचे करतील. मग त्यांना माझा सूड कळेल. असे प्रभू परमेश्वर म्हणतो.