Ezekiel 25:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो: “पलिष्ट्यांनी सूड घ्यायचा प्रयत्न केला. ते फार क्रूर होते. त्यांनी आपला राग खूप काळ मनात दाबून धरला.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
प्रभू परमेश्वर म्हणतो, पलिष्ट्यांनी सूड घेण्याची कृती केली आहे, मनात आकस धरून नाश करण्याच्या बुद्धीने त्यांनी निरंतरच्या वैरभावाने सूड घेतला आहे;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ‘पलिष्टी लोक प्रतिकाराने वागले व निरंतरच्या वैरभावाने यहूदाहचा नाश करण्यासाठी आपल्या हृदयात द्वेषबुद्धी ठेऊन त्यांचा सूड घेतला आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
प्रभू परमेश्वर असे म्हणतो, कारण आपल्या मनात फार जुने शत्रुत्व आणि तिरस्कार बाळगून पलिष्ट्यांनी यहूदावर सूड घेतला आहे आणि तिचा नाश केला आहे.