Ezekiel 25:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्यांना सांग, ‘माझ्या परमेश्वर प्रभुचा संदेश ऐका. परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणतो की माझ्या पवित्र स्थानाचा नाश झाला, तेव्हा तुम्हाला खूप आनंद झाला. इस्राएलची भूमी उद्ध्वस्त करण्यात आली, तेव्हा तुम्ही इस्राएलच्या भूमीच्या विरुद्ध होता. यहूदी लोकांना कैदी म्हणून नेण्यात आले, तेव्हा तुम्ही यहूदी लोकांच्याविरुध्द होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अम्मोन वंशजांना म्हण, प्रभू परमेश्वराचे वचन ऐका; प्रभू परमेश्वर असे म्हणतो, माझे पवित्रस्थान अपवित्र करण्यात आले, इस्राएल देश ओसाड करण्यात आला, यहूदाचे घराणे बंदिवान करून नेण्यात आले तेव्हा तू ‘वाहवा’ असे म्हटलेस;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अम्मोन्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेहचे वचन ऐका. सार्वभौम याहवेह असे म्हणतात: जेव्हा माझे पवित्रस्थान अपवित्र करण्यात आले, आणि इस्राएल देश ओसाड झाला व जेव्हा यहूदीयाचे लोक बंदिवासात गेले, तेव्हा तुम्ही “आहा!” असे म्हटले,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अम्मोनाच्या लोकांस सांग, प्रभू परमेश्वराचे वचन ऐका. प्रभू परमेश्वर असे म्हणतो की, माझे पवित्रस्थान बाटविण्यात आले तेव्हा त्याविरूद्ध होता आणि इस्राएल देश उद्ध्वस्त करण्यात आला, तेव्हा तिच्याविरूद्ध होता आणि यहूदाचे घराणे जेव्हा बंदिवासात गेले तेव्हा त्यांच्याविरुद्ध तू, अहा! म्हणालास,