Ezekiel 26:17 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ते तुझ्यासाठी पुढील शोकगीत गातील. “हे सोर, तू प्रसिद्ध नगरी होतील. तुझ्यात राहण्यासाठी लोक समुद्रपार करुन आले. तू प्रसिद्ध होतीस पण आता तू संपली आहेस समुद्रावर तुझा आणि तुझ्या लोकांचा वचक होता. मुख्य भूप्रदेशावर राहणाऱ्या लोकांवर तुझा दरारा होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते तुझ्याविषयी शोक करून म्हणतील, ‘अगे कीर्तिमान नगरी, तू जशी काय समुद्रातून उद्भवून बसली होतीस, तू समुद्रावर पराक्रमी होतीस, तू व तुझे रहिवासी ह्यांचा तेथील सर्व लोकांना वचक असे, ती तू कशी नष्ट झालीस!
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग ते तुझ्यासाठी विलाप करून तुला म्हणतील: “ ‘हे प्रसिद्ध शहरा, ज्या तुझ्यात खलाशी लोक वसत होते! ज्या तुला समुद्रातही शक्ती होती, तू व तुझे रहिवासी; तिथे राहत असलेल्या सर्वांना आतंक होतीस त्या तुझा नाश कसा झाला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते तुझ्यासाठी ओरडून विलाप करून तुला म्हणतील, “अगे, जे कोणी खलाशी तुझ्यात वस्ती करून होते त्यांचा नाश झाला आहे. जी तू बलवान प्रसिद्ध नगरी होती. ती आता समुद्रात आहे. जी तू तेथे राहणाऱ्या प्रत्येकजणास दहशत घालीत होतीस ती तू कशी नष्ट झाली आहेस?