Ezekiel 26:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी तुला मृत राहतात तेथे म्हणजे पाताळात घालवीन. पूर्वी मेलेल्यांमध्ये तू सामील होशील. इतर जुनाट, ओसाड शहरांप्रमाणे मी तुला पृथ्वीच्या तळाशी पाठवीन. तू त्या सर्वांबरोबर थडग्यात राहशील. मग तुझ्यात कोणीही वस्ती करणार नाही. तू पुन्हा कधीही वसणार नाहीस.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा गर्तेत गेलेल्या प्राचीन काळच्या लोकांकडे तुला खाली टाकून गर्तेत गेलेल्यांबरोबर प्राचीन काळापासून ओसाड असलेल्या स्थानांत पृथ्वीच्या अधोभागी तुला राहायला लावीन म्हणजे तू पुन्हा वसणार नाहीस; पण मी जिवंतांच्या भूमीला वैभव देईन.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि जे खाली गर्तेत आधी गेले आहेत त्यांच्याजवळ मी तुला खाली आणेन. पृथ्वीच्या खाली, अधोलोकाच्या खोल गर्तेत जिथे पुरातन ओसाडी आहेत, जे तिथे खाली गर्तेत आहेत आणि जे परत येणार नाहीत किंवा या जिवंतांच्या भूमीवर तुझे स्थान घेणार नाहीत अशा ठिकाणी मी तुला वसवीन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग मी तुला ते जे कोणी दुसरे खाचेत खाली प्राचीन काळच्या लोकांकडे गेले आहेत त्यांच्यासारखे प्राचीन काळापासून ओसाड असलेल्या स्थानात तुला पृथ्वीच्या अधोभागी तुला रहावयास लावीन म्हणजे तू पुन्हा वसणार नाहीस.