Ezekiel 26:7 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणतो, “सोरवर उत्तरेकडून शत्रू आणीन. तो म्हणजेच बाबेलचा राजाधिराज नबुखद्नेस्सर होय. तो प्रंचड सैन्य घेऊन येईल. त्यात घोडे, रथ, घोडेस्वार व इतर पुष्कळ सैनिक असतील. ते सैनिक पुष्कळ वेगवेगळ्या राष्ट्रांतील असतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण प्रभू परमेश्वर म्हणतो, पाहा, मी बाबेलचा राजा, राजाधिराज नबुखद्रेस्सर, ह्याला उत्तरेहून घोडे, रथ, स्वार व मोठे दळ ह्यांसह सोरेवर आणीन.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“कारण सार्वभौम याहवेह असे म्हणतात: बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर त्याचे घोडे व रथ, घोडेस्वार व विराट सैन्याला उत्तरेकडून सोरवर हल्ला करण्यास मी आणेन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पाहा! मी उत्तरेकडून बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर, राजांचा राजा याला मी घोडे व रथ, आणि घोडदळ! पुष्कळ लोकांची फौज घेऊन सोराविरूद्ध आणत आहे.