Ezekiel 27:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अर्वाद येथील पहारेकरी तुझ्या वेशीवर पहारा करीत. गम्मादचे लोक बुरुजांवर असत. ते आपल्या ढाली तुझ्या तटावर टांगीत त्यांनी तुझे सौंदर्य पूर्णत्वाला नेले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अर्वदचे लोक तुझ्या सैन्यासह तुझ्या तटांवर सभोवार असत; तुझ्या बुरुजांवर शूर पुरुष असत; ते तुझ्या तटांवर चोहोकडे आपल्या ढाली टांगून तुला सौंदर्ययुक्त करत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आरवद व हेलेकच्या माणसांनी चहूकडून तुझ्या तटांचे रक्षण केले; गम्मादचे पुरुष तुझ्या बुरुजावर होते. त्यांनी त्यांच्या ढाली तुझ्या भिंतींवर चोहीकडे टांगल्या; त्यांनी तुझे सौंदर्य पूर्णतेस आणले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अर्वदची माणसे व हेलेखचे सैनिक सभोवार तुझ्या तटावर असत आणि गम्मादाचे लोक तुझ्या बुरुजांवर असत. ते आपल्या ढाली तुझ्या तटावर चोहोकडे टांगून ठेवीत असत. त्यांनी तुझी सुंदरता पूर्णत्वाला आणली.