Ezekiel 27:13 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यावान, तुबाल आणि काळ्या समुद्राजवळचे लोक तुझ्याबरोबर व्यापार करीत. तुझ्याजवळील वस्तूंच्या मोबदल्यात ते गुलाम व कास्य देत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यावान, तुबाल व मेशेख हे तुझ्याबरोबर व्यापार करत; तुझ्या मालाचा मोबदला म्हणून ते तुला माणसे व पितळेची भांडी देत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“ ‘ग्रीस, तूबाल व मेशेख यांनीही तुझ्याबरोबर व्यापार केला; त्यांनी तुझ्या मालाच्या मोबदल्यात मानवप्राणी व कास्याच्या वस्तू दिल्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यावान, तुबाल आणि मेशेख तुझ्याबरोबर मनुष्य जीव व पितळेच्या वस्तू ही देऊन तुझ्याशी व्यापार करीत असत. ते तुझा व्यापारी माल हाताळत होते.