Ezekiel 27:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ददानी लोकसुद्धा तुझ्याशी व्यापार करीत. तू पुष्कळ ठिकाणी तुझ्या वस्तू विकत होतीस. त्या बदल्यात लोक तुला हस्तिदंत व टेंबुरणीचे लाकूड देत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ददानी लोक तुझ्याबरोबर व्यापार करत; अनेक द्वीपे तुझ्या व्यापाराच्या सोईची असत; ते तुझ्या मालाबद्दल तुला हस्तिदंती शिंगे व टेंबुरणीचे लाकूड (अबनूस) देत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“ ‘ददानच्या लोकांनी तुझ्याबरोबर व्यापार केला आणि पुष्कळ समुद्रतट तुझे ग्राहक होते; त्यांनी तुला मोबदला म्हणून हस्तिदंत आणि टेंबुरणीचे लाकूड दिले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ददानी माणसे पुष्कळ किनारपट्टीवर तुझे व्यापारी होते. व्यापारी माल तुझ्या हातात होता. ते तुला हस्तिदंत व टेंबुरणीचे लाकूड भेट म्हणून परत पाठवत होते.