Ezekiel 27:32 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“ते तुझ्यासाठी रडतील आणि ओक्साबोक्सी रडताना तुझ्याबद्दलचे पुढील शोकगीत गातील: “सोरसारखे कुणी नाही. सोरचा भर समुद्रात नाश झाला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते शोकाकुल होऊन तुझ्याविषयी विलाप करून म्हणतात, ‘सोरेप्रमाणे, समुद्रात गडप झालेल्या सोरेप्रमाणे, कोणाची तरी दशा झाली आहे काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते तुझ्यासाठी विलाप व शोक करीत असता, ते तुझ्यासाठी विलापगीत गातील: “सोर, जी समुद्रात निःशब्द झाली, तिच्याप्रमाणे अजून कोण आहे?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते तुझ्यासाठी आक्रोशाने विलाप करून म्हणतील, सोरेसारखी जी समुद्रामध्ये निशब्द झाली आहे, तिच्यासारखी कोणती तरी नगरी आहे काय?