Ezekiel 27:33 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तुझे व्यापारी समुद्रापर करुन गेले. तुझ्या प्रचंड संपत्तीने आणि तुझ्या मालाने तू अनेकांना तुप्त केलेस. तू पृथ्वीवरील राजांना श्रीमंत केलेस.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जलमार्गाने तुझा माल जात असे तेव्हा तू बहुत राष्ट्रांची चंगळ करीत असायचीस; तू आपल्या विपुल मालाने व मोठ्या सौद्याने जगातील राजांना सधन करीत असायचीस.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा तुझा माल समुद्रावरून जात असे, तेव्हा तू पुष्कळ राष्ट्रांना संतुष्ट केले; तुझ्या महान संपत्ती व मालाने पृथ्वीवरील राजांना तू समृद्ध केलेस.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुझ्या व्यापारांच्या वस्तू समुद्रातून जात असत तेव्हा तू पुष्कळांना तृप्त करीत असत; तुझ्या प्रचंड संपत्तीने आणि आपल्या विकण्याचे पदार्थ फार असल्यामुळे तू पृथ्वीवरील राजांना श्रीमंत केलेस.