Ezekiel 27:7 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तुझ्या शिडासाठी त्यांनी मिसरचे सुंदर वेलबुट्टीदार तागाचे कापड वापले. ते शीड तुझे निशाण होते. तुझ्या खोलीचे पडदे निळे जांभळे होते. ते पडद्याचे कापड एलीशाहून आणलेले होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुझे शीड मिसर देशाहून आणलेल्या वेलबुट्टीदार उत्तम तागाचे होते, तुला ते निशाणादाखल होते; तुझे छत एलीशा बेटातील निळ्या व जांभळ्या रंगांच्या कापडाचे होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुझे शीड इजिप्तचे नक्षीदार रेशमी ताग होते ते तुझा झेंडा होते; तुझे छत एलिशाह द्वीपातील निळ्या व जांभळ्या रंगाच्या कापडाचे होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुझे शीड, ते तुला निशाण व्हावे म्हणून मिसर देशाहून आणलेल्या वेलबुट्टीदार बारीक सुताचे होते. ते पडद्याचे कापड एलीशा बेटाहून आणलेले निळ्या व जांभळ्या रंगाच्या कापडाचे तुझे छत होते.