Ezekiel 28:13 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तू एदेनमध्ये राहात होतास. एदेन हा देवाचा बाग आहे. तुझ्याजवळ माणके, पुष्कराज, हिरे, लसणा, गोमेद, सूर्यंकांत मणी, नीलमणी, वैदूर्य पाच अशी सर्व प्रकारची मोल्यवान रत्ने होती, आणि ती सर्व सोन्याच्या कोंदणात बसविलेली होती. ज्या दिवशी तुला निर्माण केले त्याच दिवशी तुला हे सौदंर्य देण्यात आले. देवाने तुला सामर्थ्यशाली केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
देवाचा बाग एदेन ह्यात तू होतास; अलाक, पुष्कराज, हिरा, लसणा, गोमेद, यास्फे, नीलमणी, पाचू, माणिक, व सोने असे अनेक तर्‍हेचे जवाहीर तुझ्या अंगभर होते; खंजिर्‍या व बासर्‍या ह्यांचे कसब तुझ्या येथे चालत असे; तुला निर्माण केले त्या दिवशी त्यांची योजना झाली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तू एदेन बागेत, परमेश्वराच्या बागेत होतास; प्रत्येक मौल्यवान पाषाण म्हणजेच अलाक, पुष्कराज आणि हिरा, लसणा, गोमेद, यास्फे आणि नीलमणी, पाचू, माणिक व रत्ने अशांनी तू सजला होता. तुझ्या बैठकी व पाटे सोन्याच्या घडल्या होत्या; तू जन्मला त्याच दिवशी ते तयार केले होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
देवाची बाग एदेनमध्ये तू होतास. प्रत्येक मौल्यवान खड्यांनी तू आच्छादलेला होतास. अलाक, पुष्कराज, हिरे, लसणा, गोमेद, यास्फे, नीलमणी, पाचू, माणिक, सोने अशी सर्व प्रकारची जवाहीर तुझ्या अंगभर होती, तुला निर्माण केले त्याच दिवशी तुला घालण्यासाठी ते तयार केले होते.