Ezekiel 28:16 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तुझ्या व्यापाराने तुला खूप संपत्ती मिळवून दिली खरी, पण त्याने तुझ्यात क्रूरपणा निर्माण झाला, आणि तू पाप केलेस. म्हणून मी तुला एखाद्या घाणेरड्या गोष्टीसारखी वागणूक दिली. मी तुला देवाच्या पर्वतावरुन फेकून दिले. तू एक खास अभिषिक्त करुब देवदूत होतास, तुझे पंख माझ्या सिंहासनावर पसरत होते, पण मी तुला, अग्नीप्रमाणे तेजस्वी असलेल्या रत्नांपासून, सक्तीने दूर केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुझा व्यापार मोठा असल्यामुळे तुझ्या हृदयात अपकारबुद्धी शिरून तू पातक केलेस; म्हणून मी तुला भ्रष्ट समजून परमेश्वराच्या पर्वतावरून लोटून दिले. हे पाखर घालणार्‍या करूबा! त्या अग्नीप्रमाणे झगझगणार्‍या पाषाणांमधून काढून मी तुझा नाश केला आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुझ्या विस्तारित व्यापारामुळे तू आतंकाने भरला आणि तू पाप केले. म्हणून लज्जेने मी तुला परमेश्वराच्या डोंगरावरून लोटून दिले, आणि हे संरक्षक करुबा, मी तुला अग्निपाषाणातून काढून टाकले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुझा व्यापार खूप मोठा असल्यामुळे तू बलात्काराने भरला आहे, तू पाप केले आहे म्हणून मी तुला भ्रष्ट समजून देवाच्या पर्वतावरुन फेकून दिले आणि हे पाखर घालणाऱ्या करुबा, मी तुला अग्नीप्रमाणे धगधगणाऱ्या पाषाणातून, काढून मी तुला नष्ट केले आहे.