Ezekiel 28:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तू खूप चुका केल्यास तू कपटी व्यापारी झालास आणि अशा तऱ्हेने, तू पवित्र स्थान अपवित्र केलेस. म्हणून मी तुझ्यातील आगीनेच तुला जाळीन. जमिनीवर तू राख होऊन पडशील. आता सर्वजण तुझी लाजिरवाणी स्थिती पाहू शकतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
खोटा व्यापार चालवून तू बहुत पातके केलीस, त्यांनी तू आपली पवित्रस्थाने विटाळलीस म्हणून तुझ्यातून अग्नी निघून तुला खाऊन टाकील, असे मी केले आहे आणि तुला पाहणार्यांच्या डोळ्यांदेखत मी पृथ्वीवर तुझी राखरांगोळी केली आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुझ्या पुष्कळ पापाने व खोट्या व्यापारामुळे तू तुझी पवित्रस्थाने विटाळलीस. म्हणून तुझ्यातून अग्नी येईल आणि तुला भस्म करेल असे मी केले, आणि सर्व बघणार्यांच्या देखत मी तुला राखेत मिळविले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुझ्या खूप पापांमुळे आणि व्यापारातील अप्रामाणिकपणामुळे, तू आपले पवित्र स्थान अपवित्र केलेस. म्हणून मी तुझ्यामधून अग्नी काढला आहे, त्याने तुला खाऊन टाकले आहे. जे कोणी पाहतात त्या सर्वांच्यादेखत मी पृथ्वीवर तुझी राख केली आहे.