Ezekiel 28:23 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी सीदोनला रोगराई व मृत्यू पाठवीन. शहराबाहेरील तलवार (शत्रूसैनिक) तो मृत्यू आणील. मगच त्यांना कळून चुकेल की मी परमेश्वर आहे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी तिच्यात मरी पाठवीन, तिच्या रस्त्यावर रक्ताचा सडा घालीन; तिच्यावर चोहोकडून तलवार चालेल आणि लोक घायाळ होऊन तिच्या ठायी पडतील; तेव्हा त्यांना समजेल की, मी परमेश्वर आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी तुझ्यावर मरी पाठवेन आणि तुझ्या रस्त्यांवर रक्त वाहवीन. चहूकडून तुझ्याविरुद्ध चालविलेल्या तलवारीने वधलेले तुझ्यातच पडतील. तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी तिच्यात मरी पाठवीन आणि तिच्या रस्त्यात रक्त पाठवीन आणि तलवार तुमच्याविरुध्द सर्व बाजूंनी येईल तेव्हा घायाळ झालेले तुम्हामध्ये पडतील मग त्यांना समजेल की, मी प्रभू परमेश्वर आहे.