Ezekiel 28:25 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो “मी इस्राएलच्या लोकांना इतर राष्ट्रांत विखुरविले. पण मी पुन्हा त्यांना एकत्र आणीन मग त्या राष्ट्रांना मी पवित्र असल्याचे कळेल व ते माझ्याशी त्याप्रमाणे वागतील. त्या वेळी, माझा सेवक याकोब याला मी दिलेल्या भूमीवर इस्राएल लोक राहतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
प्रभू परमेश्वर म्हणतो, इस्राएल घराणे ज्या ज्या राष्ट्रांत पांगले आहे त्यांतून मी त्यांना एकत्र करीन आणि परराष्ट्रांदेखत त्यांच्या ठायी पवित्र ठरेन; मग जो देश मी आपला सेवक याकोब ह्याला दिला त्यात ते वस्ती करतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ज्या राष्ट्रांमध्ये इस्राएली लोक पांगले आहेत तिथून मी त्यांना जेव्हा एकवट करेन, तेव्हा त्यांच्याद्वारे राष्ट्रांच्या देखत मी पवित्र मानला जाईन. तेव्हा जो देश मी माझा सेवक याकोबाला देऊ केला होता, ते त्यांच्या त्या स्वदेशात राहतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
प्रभू परमेश्वर असे म्हणतो, मी इस्राएल घराणे ज्या ज्या राष्ट्रांत विखुरविले आहे, त्यांतून मी त्यास एकत्र आणीन आणि मग मी त्या विधर्मी राष्ट्रांच्या देखत त्याच्याठायी पवित्र ठरेन; मग मी जो देश आपला सेवक याकोब याला दिला त्यामध्ये ते राहतील.