Ezekiel 28:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी परक्यांना तुझ्याविरुद्ध लढण्यासाठी आणीन. ते राष्ट्रांमध्ये सर्वांत भयंकर आहेत. ते तलवारी उपसतील आणि तुझ्या शहाणपणाने मिळविलेल्या सर्व सुंदर गोष्टींचा नाश करतील. तुझे वैभव ते लयाला घालवितील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
म्हणून पाहा, मी तुझ्यावर परकीय लोक आणतो; तुझ्यावर अन्य राष्ट्रांतले उग्र पुरुष आणतो; तुझ्या अकलेच्या सौंदर्यावर ते तलवार उपसतील व तुझे तेज भ्रष्ट करतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
म्हणून मी परकीय लोकांना तुझ्याविरुद्ध आणेन, जे राष्ट्रांमध्ये सर्वात क्रूर आहेत; तुझे सौंदर्य व ज्ञान याविरुद्ध ते त्यांची तलवार उपसतील आणि ती तुझ्या चमकत्या वैभवाला भेदून जाईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी परक्यांना तुझ्याविरूद्ध आणीन, दुसऱ्या राष्ट्रांतून भयंकर माणसे आणीन. आणि ते तुझ्या शहाणपणाच्या सुंदरतेवर आपल्या तलवारी उपसतील आणि ते तुझे वैभव भ्रष्ट करतील.