Ezekiel 28:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
माणूस तुला ठार मारेल. तरी तू त्याला “मी देव आहे.” असे म्हणशील का? नाही तो तुला ताब्यात घेईल. मग तुला समजेल की तू मानव आहेस, देव नव्हे!
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू आपल्या वधणार्यासमोर ‘मी देव आहे,’ असे म्हणशील काय? घायाळ करणार्याच्या हाती सापडलास तो तू देव नव्हेस, मानव आहेस.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा जे लोक तुला मारतात त्यांच्यादेखत तू म्हणशील काय, “मी देव आहे?” जे तुझा वध करतात त्यांच्या हातात, तू केवळ मानव असशील, देव नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू आपल्या वधणाऱ्यासमोर, मी देव आहे. असे खचित म्हणशील काय? ज्या कोणी तुला भोसकले त्यांच्या हाती तू आहेस तो तू देव नव्हे व मानव आहेस.