Ezekiel 29:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आणि इस्राएलचे लोक पुन्हा कधीही मिसरवर विसंबणार नाहीत. इस्राएल लोकांना त्यांचे पाप आठवेल. मदतीसाठी देवाकडे न जाता आपण मिसरकडे गेलो हे त्यांना आठवेल आणि त्यांना समजेल की मीच परमेश्वर, प्रभू, आहे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते ह्यापुढे इस्राएल घराण्याला आधार होणार नाहीत; त्यांच्याकडे त्यांचे मन गेले तर त्यांना त्यांच्या पातकाचे स्मरण होईल; तेव्हा त्यांना समजेल की मी प्रभू परमेश्वर आहे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
इजिप्त यापुढे इस्राएल लोकांसाठी आणखी आधार नसतील परंतु त्यांच्या पापाची आठवण म्हणून ते त्यांच्याकडे मदतीसाठी जातील. तेव्हा ते जाणतील की मीच सार्वभौम याहवेह आहे.’ ”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते यापुढे इस्राएलाच्या घराण्याला विश्वासाचा विषय असे होणार नाहीत. जेव्हा त्यांचे मुख मिसराकडे वळेल तेव्हा त्यांना अन्यायाची आठवण येईल. मग त्यांना समजेल की मीच प्रभू परमेश्वर आहे.”