Ezekiel 29:18 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“मानवपुत्रा, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने आपल्या सैन्याला सोरविरुद्ध जोराची लढाई करायला लावली. त्यांनी प्रत्येक सैनिकाचा गोटा केला. ओझी उचलून त्यांच्या खांद्याची सालटी निघाली. नबुखद्नेस्सरने व त्याच्या सैन्याने सोरचा पराभव करण्यासाठी खूप कष्ट घेतले. पण ह्या कष्टाचे फळ त्यांना मिळाले नाही.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“मानवपुत्रा, बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याने सोरेस वेढा घातला तेव्हा त्याने आपल्या सैन्यास भारी कष्ट करायला लावले; सर्वांच्या डोक्यांना टक्कले पडली, खांद्यांची सालटी निघाली, तरी त्याने जो खटाटोप केला त्याचा त्याला किंवा त्याच्या सैन्याला योग्य मोबदला मिळाला नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“मानवपुत्रा, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने त्याच्या सैन्याला कठोरतेने सोरविरुद्ध पाठवले; प्रत्येक डोके टकले झाले आणि प्रत्येक खांदा सोलून काढला. तरीही त्याने हे जे कठीण कष्टाचे अभियान सोरविरुद्ध चालविले त्याबद्दल त्याला व त्याच्या सैन्याला काहीही प्रतिफळ मिळाले नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“मानवाच्या मुला, बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर याने सोरेस वेढा दिला तेव्हा त्याने आपल्या सैन्याला सोरविरूद्ध कठीण परिश्रम करायला लावले. प्रत्येक डोक्याची हजामत केली होती आणि प्रत्येक खांद्याची सालटी निघाली होती पण त्याने जे कठीण परिश्रम सोरेविरूद्ध केले त्यामुळे त्यास व त्याच्या सैन्याला सोरेतून कधीही काही वेतन मिळाले नाही.”