Ezekiel 29:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
म्हणून परमेश्वर, माझा प्रभू म्हणतो, “मिसरची भूमी मी बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर यास देईन. तो मिसरच्या लोकांना घेऊन जाईल. मिसरमधील मौल्यवान वस्तूही तो घेईल. हा नबुखद्नेस्सरच्या सैन्याचा मोबदला असेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो, पाहा, बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याला मी मिसराचा मुलूख देईन; तेव्हा तो त्यांचा समुदाय हिरावून नेईल, त्याने लुटलेले तो लुटील; त्याने हरण केलेले तो हरण करील, असा त्याच्या सैन्यास मोबदला मिळेल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यास्तव सार्वभौम याहवेह असे म्हणतात: मी इजिप्त देशाला बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरच्या हाती देणार आहे आणि तो त्यांची संपत्ती घेऊन जाईल. तो हरण करून लुटून घेईल आणि तो देश त्याच्या सैन्याला मोबदला म्हणून होईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून प्रभू परमेश्वर असे म्हणतो, “पाहा! मिसर देश मी बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर यास देईन आणि तो त्यांची संपत्ती घेऊन जाईल, त्यांची मालमत्ता लुटेल व तेथे त्यास जे सापडेल ते घेऊन जाईल. ते त्याच्या सैन्याचे वेतन असे होईल.